अब्दुल-बहांविषयी काही गोष्टी

[1]

अब्दुल-बहा लंडनमध्ये असतांना एके दिवशी एका स्त्रीने त्यांच्या भेटीची परवानगी मागितली. सभागृहात तिला भेटलेल्या व्यक्तीने विचारले, ‘काय तूम्ही भेटीची वेळ आधी ठरवून घेतली आहे?’

त्या स्त्रीने आगावू भेटीची वेळ ठरवून घेतली नव्हती, आणि म्हणून ती दु:खी होती. तो व्यक्ती म्हणाला, ‘मला क्षमा करा, परंतु आता ते अतिशय प्रतिष्ठित लोकांशी बोलण्यात गुंतले आहेत, आणि म्हणून यावेळी त्यांच्या बोलण्यात अडथळा आणता येणार नाही.’

ती स्त्री परत जाण्यासाठी वळली, तिला इतकी असहाय्यता वाटली की ती आपली विनंती पुन्हा एकदा करू शकत नव्हती ज्यामुळे ती अत्यंत निराश झाली होती. ती पायऱ्यांवरून खाली उतरू लागली आणि ते घर सोडून निघण्याच्या तयारीत होती, इतक्यात अब्दुल-बहांचा एक सेवक तत्परतेने तिला थांबविण्यासाठी आला.

त्या सेवकाने सांगितले की अब्दुल-बहा तिला भेटू इच्छितात आणि तिला त्यांच्याकडे घेऊन येण्याचे आदेश दिले आहेत.

त्या बैठकीतील प्रत्येकाने अब्दुल-बहांचा आवाज त्यांच्या अतिथीगृहाच्या दरवाजापासून ऐकला होता, “एक हृदय दुखविण्यात आले आहे. त्वरा करा आणि तिला माझ्याकडे आणा!”

[2]

अब्दुल-बहांनी पाश्चात्य देशांत दिलेल्या बेतींच्या कालावधीत कित्येक लोक त्यांचा फोटो घेण्याचा प्रयत्न करत. त्यांच्या दाराभोवती कॅमेरा घेऊन, त्यांचे छायाचित्र मिळविण्याच्या संधीसाठी ते लक्षपूर्वक वाट पहात असत. एके प्रसंगी त्यांच्या यजमानीणने वर्तमानपत्राच्या छायाचित्रकारला विचारले, ‘काय तुम्हाला वाटते की, दुसऱ्या देशातून आलेल्या पाहुण्यांचे छायाचित्र त्यांच्या इच्छेविरुद्ध घेण्याचा आग्रह धरणे अतिशय शिष्टसंमत आहे?’

‘नाही बाईसाहेब’, छायाचित्रकार म्हणाला, ‘तथापि, इतरांना त्यांचे छायाचित्र मिळविण्यात यश मिळाले आणि मी जर अपयशी ठरलो तर माझा व्यवस्थापक मला मूर्ख समजेल.’

नंतर जेव्हा ही गोष्ट त्या स्त्रीने अब्दुल-बहांना सांगितली तेव्हा ते मनसोक्त हसले व म्हणाले, “छायाचित्रे घ्यायचीच असली तर ती चांगली असणे हे आवश्यक आहे. त्या वर्तमानपत्रात छापलेली छायाचित्रे खरोखरच वाईट आहेत.”

त्यानंतर अब्दुल-बहांनी मित्रांना आनंदित करण्यासाठी आपली छायाचित्रे काढण्यास कृपाळूपणे मान्यता दिली. तथापि त्यांचा फोटो काढण्याविषयी ते म्हणाले, “आपले स्वतःचे एखादे चित्र असणे मुळीच महत्त्वाचे नाही. एक चित्र म्हणजे केवळ एक व्यक्तिमत्व असते जे केवळ एका दिव्याप्रमाणे आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्या दिव्यात तेवत असलेला प्रकाश, जो तुम्ही छायाचित्रात पाहू शकत नाही.”

[3]

अब्दुल-बहांनी पाश्चात्य देशांत दिलेल्या बेतींच्या कालावधीत कित्येक लोक त्यांचा फोटो घेण्याचा प्रयत्न करत. त्यांच्या दाराभोवती कॅमेरा घेऊन, त्यांचे छायाचित्र मिळविण्याच्या संधीसाठी ते लक्षपूर्वक वाट पहात असत. एके प्रसंगी त्यांच्या यजमानीणने वर्तमानपत्राच्या छायाचित्रकारला विचारले, ‘काय तुम्हाला वाटते की, दुसऱ्या देशातून आलेल्या पाहुण्यांचे छायाचित्र त्यांच्या इच्छेविरुद्ध घेण्याचा आग्रह धरणे अतिशय शिष्टसंमत आहे?’

‘नाही बाईसाहेब’, छायाचित्रकार म्हणाला, ‘तथापि, इतरांना त्यांचे छायाचित्र मिळविण्यात यश मिळाले आणि मी जर अपयशी ठरलो तर माझा व्यवस्थापक मला मूर्ख समजेल.’

नंतर जेव्हा ही गोष्ट त्या स्त्रीने अब्दुल-बहांना सांगितली तेव्हा ते मनसोक्त हसले व म्हणाले, “छायाचित्रे घ्यायचीच असली तर ती चांगली असणे हे आवश्यक आहे. त्या वर्तमानपत्रात छापलेली छायाचित्रे खरोखरच वाईट आहेत.”

त्यानंतर अब्दुल-बहांनी मित्रांना आनंदित करण्यासाठी आपली छायाचित्रे काढण्यास कृपाळूपणे मान्यता दिली. तथापि त्यांचा फोटो काढण्याविषयी ते म्हणाले, “आपले स्वतःचे एखादे चित्र असणे मुळीच महत्त्वाचे नाही. एक चित्र म्हणजे केवळ एक व्यक्तिमत्व असते जे केवळ एका दिव्याप्रमाणे आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्या दिव्यात तेवत असलेला प्रकाश, जो तुम्ही छायाचित्रात पाहू शकत नाही.

[4]

अब्दुल-बहांना कधीही कशाचीच भीती वाटत नव्हती. पॅरिसमध्ये असतांना, एका अत्यंत सुप्रतिष्ठित बहाई महिलेस एक पत्र मिळाले ज्यात लिहिले होते, ‘अब्दुल-बहांना ही चेतावणी देणे आवश्यक आहे की, (एका विशिष्ट देशात) जेथे त्यांनी जाण्याचे ठरवले आहे, हे त्यांच्यासाठी धोक्याचे आहे.’

ते पत्र ज्या व्यक्तीनेलिहिले होते तो त्या महिलेचा विश्वासू मित्र होता त्यामुळे तिला वाटले की अब्दुल-बहांना त्या धोक्याविषयी सांगावे.

अब्दुल-बहांनी ही बातमी ऐकली आणि केवळ स्मित करून म्हटले, “माझ्या मुली, काय तुला अद्यापपर्यंत हे समजले नाही की माझ्या जीवनभर एक दिवस देखील मी कधीच धोक्याबाहेर राहिलो नाही आणि हे जग सोडून मला माझ्या परम पित्याकडे जाण्यात आनंदी असले पाहिजे.”

त्या महिलेस भीती आणि दुःख वाटत होते. ती अब्दुल-बहांना म्हणाली, ‘आपण अशा अवस्थेत आमच्यापासून जावे हे आम्ही इच्छित नाही.’

अब्दुल-बहा म्हणाले, “संत्रस्त होऊ नकोस कारण सर्वश्रेष्ठ परमेश्वरापासून मला जे सामर्थ्य मिळाले आहे त्यापेक्षा या शत्रूंजवळ माझ्या जीवनावर गाजविण्यासारखे कोणतेच सामर्थ्य नाही. माझ्या परमप्रिय परमेश्वराने जर इच्छिले असेल की माझे जीवन रक्त त्याच्या मार्गावर समर्पित व्हावे, तर तो दिवस वैभवशाली असेल आणि माझी हीच अभिलाषा आहे की तसे व्हावे.”

अब्दुल-बहा असे बोलले तेव्हा मित्रांना श्रद्धा बाळगणे याचा अर्थ काय असतो याविषयी एक नवीन जाणीव लाभली. त्यांची श्रद्धा इतकी बळकट झाली की एके दिवशी बागेत त्यांच्या समूहाकडे एक अपरिचित व्यक्ती आला आणि त्याने सांगितले की केवळ अब्दुल-बहांचेच जीवन नव्हे तर त्या सर्वांचे जीवन धोक्यात आहे. तेव्हा एकाने शांतपणे उत्तर दिले, ‘आम्हास भीती नाही कारण जे दैवी सामर्थ्य अब्दुल-बहांचे संरक्षण करते, तेच त्यांच्या सेवकांचे देखील संरक्षण करते.’

या उत्तराने तो व्यक्ती इतका चकित झाला की तो पुढे काहीही न बोलता निघून गेला.

[5]

अब्दुल-बहा ज्या पद्धतीने धर्मश्रद्धेविषयी शिकवीत असत त्याचे हे एक आणखी उदाहरण आहे.

एका व्यक्तीची अवघड शस्त्रक्रिया होती आणि असे वाटत होते की एका वर्षानंतर त्याच्यावर आणखी एखादी शस्त्रक्रिया होणार होता. स्वाभाविकपणे तो हताश झाला होता आणि तो इतका हताश होता की त्याला वाटले त्याच्या जीवनात जडलेली धुम्रपानाची सवय त्याने सोडून द्यावी. ह्या व्यक्तीस अशी घमेंड होती की त्याची इच्छा झाली तर तो केव्हाही धुम्रपानाची सवय बंद करण्यास समर्थ आहे. त्याच्या जीवनाच्या कालावधीत त्याने कित्येकदा धुम्रपान बंद केले होते परंतु ह्यावेळी तो अतिशय उदासीन असतांना त्याला आश्चर्य वाटले की तो एक दोन दिवस तरी धुम्रपान सुरु केल्याशिवाय ते पुनः बंद करू शकणार नव्हता. शेवटी त्याने अब्दुल-बहांकडे जाऊन त्यांचे सहाय्य घ्यावे असे ठरविले. त्यास हे माहित होते की बहाईंनी धुम्रपान वर्ज्य करावे असे अब्दुल-बहांनी त्यांना सांगितले होते. तेव्हा तो स्वतःशी म्हणाला, ‘खात्रीने ह्या संवायीवर विजय कसा मिळवावा हे मला अब्दुल-बहांनी सांगितले.’

म्हणून नंतर तो जेव्हा अब्दुल-बहांना भेटला तेव्हा याविषयी त्याने सर्वकाही त्यांना सांगितले. एखादा मुलगा आपल्या पालकाजवळ आपला पश्चाताप जसा व्यक्त करतो तसे तो त्यांना सांगू लागला आणि केवळ काही शब्दानंतर त्याचा आवाज हार्दिक स्तब्धतेत लुप्त झाला. परंतु अब्दुल-बहा इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा कितीतरी चांगले समजू शकले असते. त्यांनी त्या व्यक्तीकडे इतक्या प्रेमळ रीतीने पाहिले की त्याला अब्दुल-बहांच्या दृष्टीत केवळ जिव्हाळाच दिसला. एका क्षणानंतर अब्दुल-बहांनी त्याला शांतपणे विचारले, “तू किती धुम्रपान करतोस?”, आणि त्याने सर्व काही सांगितले.

नंतर अब्दुल-बहा म्हणाले, “मला वाटत नाही की इतक्या थोड्या सिगारेटी तुला इजा पोहचवितील. पौर्वाज्य देशात काही लोक सतत धुम्रपान करतात जेथे त्यांचे केस, त्यांची दाढी आणि त्यांचे कपडे धुराने माखून जातात आणि नेहमी त्यांची अतिशय दुर्गंधी येते. परंतु ज्या अर्थी तू असे करीत नाहीस आणि तू कित्येक वर्षांपासून धुम्रपान करीत राहिला आहेस म्हणून त्यामुळे तुला कोणताही इजा होईल असे मला वाटत नाही.”

अब्दुल-बहांनी स्मित हास्य केले आणि त्यांचे कोमल डोळे मिचकावल्यासारखे वाटले, जणू काही, ते एका अलौकिक दैवी विनोदाचा आस्वाद घेत आहेत.

तो व्यक्ती पूर्णपणे चकित झाला. अब्दुल-बहांनी त्यास धूम्रपान दोषांवर व्याख्यान दिले नव्हते. त्यांनी आरोग्यावरील तंबाखूचे दुष्परिणाम समजावून दिले नव्हते. त्यांनी वासनांवर विजय मिळविण्यासाठी आपल्या इच्छाशक्तीचा उपयोग करण्याचे त्यास सांगितले नव्हते. या ऐवजी त्यांनी त्यास संपूर्ण स्वातंत्र्य दिले होते. हे त्या व्यक्तीस पुरेसे समजले नाही परंतु काही का असेना त्याला पुष्कळच मोकळेपणा वाटला कारण तो हे समजू शकला की अब्दुल-बहांनी त्याला विचारपूर्वक सल्ला दिला होता. त्याचा अंतर्गत कलह दूर झाला, निराशा नाहीसी झाली आणि त्या दिवशी अपराध्याच्या भावनेने त्याने आपल्या सिगारेटी ओढल्या नाहीत. तथापि वास्तविक आश्चर्य हे होते की त्या संभाषणाच्या दोन दिवसांनतर त्या व्यक्तीस हे दिसून आले की तंबाखूसाठी त्याची वासना पूर्णपणे नाहीसी झाली होती आणि पुनः सात वर्षे त्याने धुम्रपान केले नाही.

या विषयी अधिक माहिती

Back to Top