केंब्रिज विद्यापीठाचे प्राध्यापक एडवर्ड जी. ब्राऊन अब्दुल-बहांना भेटल्यानंतर म्हणाले ‘मी क्वचितच अशा व्यक्तीला भेटलो असेन ज्याच्या रूपाने, गुणाने आणि वागणुकीने मी असा भाळलो असेन! जे कोणी त्यांना भेटत त्यांच्या मनात अब्दुल-बहांच्या महानतेबद्दल शंकेला जागाच नव्हती.’
अब्दुल-बहांचे चरित्र कितीही चुंबकीय आणि त्यांची आंतरिक शक्ति कितीही भेदक का असेना तरीपण धर्माच्या इतिहासात इतके सर्वोत्कृष्ट चरित्र आढळत नाही. ह्याची पुष्टी बहाई पवित्र लिखाणात अशाप्रकारे केली आहे , “अब्दुल-बहांच्या व्यक्तीमत्वात, अतुलनीय मानवाचे उत्तम गुणांचा, मानवाचे अलौकिक ज्ञानाचा आणि परिपूर्णता ह्या सर्वांचे समिश्रण अगदी योग्य प्रमाणात सौहार्दपूर्ण रूपेण आहे.”