बहाई धर्मश्रद्धेत अब्दुल-बहांचे महत्त्वपूर्ण स्थान

केंब्रिज विद्यापीठाचे प्राध्यापक एडवर्ड जी. ब्राऊन अब्दुल-बहांना भेटल्यानंतर म्हणाले ‘मी क्वचितच अशा व्यक्तीला ‌भेटलो असेन ज्याच्या रूपाने, गुणाने आणि वागणुकीने मी असा भाळलो असेन! जे कोणी त्यांना भेटत त्यांच्या मनात अब्दुल-बहांच्या महानतेबद्दल शंकेला जागाच नव्हती.’

अब्दुल-बहांचे चरित्र कितीही चुंबकीय आणि त्यांची आंतरिक शक्ति कितीही भेदक का असेना तरीपण धर्माच्या इतिहासात इतके सर्वोत्कृष्ट चरित्र आढळत नाही. ह्याची पुष्टी बहाई पवित्र लिखाणात अशाप्रकारे केली आहे , “अब्दुल-बहांच्या व्यक्तीमत्वात, अतुलनीय मानवाचे उत्तम गुणांचा, मानवाचे अलौकिक ज्ञानाचा आणि परिपूर्णता ह्या सर्वांचे समिश्रण अगदी योग्य प्रमाणात सौहार्दपूर्ण रूपेण आहे.”

बहाउल्लाह यांच्या संविदेचे केंद्रबिंदू

धार्मिक उत्तराधिकाराच्या संदर्भात सर्व धर्म नेहमीच साशंक राहिले आहेत. खऱ्या उत्तराधिकाऱ्याच्या संदर्भात येशू ख्रिस्त आणि मुहम्मद पैगंबर यांच्या बाबतीतही हेच झाले, पवित्र ग्रंथांच्या वेगवेगळ्या स्पष्टीकरणामुळे इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मांमध्ये झालेल्या खोल मतभेदांमुळे त्यांत वेगवेगळे पंथ आणि दुही निर्माण झाली.

अब्दुल-बहा एक केंद्रबिंदू म्हणून, ज्यांच्याकडे सर्व बहाई मार्गदर्शनासाठी वळतील, या खात्रीद्वारे बहाउल्लाहांनी विश्वाच्या कानाकोपऱ्यात विश्वशांति स्थापित करण्याची उमेद लोकांच्या मनात जागृत करून त्यांना आश्वस्त केले. ही संविदा एक साधन होते ज्याद्वारे बहाई समुदायाची एकता सुनिश्चित केली गेली आणि बहाउल्लाहांच्या शिकवणींची अखंडता सुरक्षित ठेवली गेली. अब्दुल-बहा हे केंद्रबिंदु असल्याशिवाय बहाउल्लाहांची अद्वितीय सृजनात्मक प्रकटीकरणाची शक्ति मानवतेपर्यंत पोहचू शकली नसती आणि त्याचे महत्वही पूर्णपणे प्रकाशात आले नसते.

अब्दुल-बहांनी त्यांच्या पित्याच्या शिकवणीचे मथितार्थ स्पष्ट केले, त्यांच्या सिद्धांताची फोड करून विस्तारपूर्वक स्पष्ट केले आणि संविधानिक संस्थांच्या केंद्रभूत गुणधर्मांची रूपरेषा आखून दिली. ते बहाई समाजाचे अचूक मार्गदर्शक आणि बहाउल्लाह यांच्या द्रुतगतिने प्रसरण पावणाऱ्या समाजाचे शिल्पकार होते. त्याचबरोबर, अब्दुल-बहांनी आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक वागणुकीत इतकी परिपूर्णता दर्शविली की मानवतेला एक उच्चकोटी सहनशीलतेचे जिवंत अनुकरणीय आदर्श मिळाले.

५ मे १९१२ रोजी, शिकागोतील प्लायमाऊथ कंपनीत अब्दुल-बहा भाषण करतांना

महत्वपूर्ण सत्यांची घोषणा

त्यांच्या लिखाणातून आणि वेळोवळी त्यांच्या यात्रांच्या ‌दरम्यान अब्दुल-बहांनी अथकपणे बुद्धिवादी नेत्यांना आणि अगणित जनसमूहाला उद्देशून काही मूलभूत सत्यांची घोषणा केली. त्यात समाविष्ट आहेत: “परंपरा आणि अंधविश्वासापासून मुक्त पद्धतीने सत्याचा स्वतंत्रपणे शोध; संपूर्ण मानवजातीची एकता, जे बहाई विश्वधर्माचे मुख्य तत्व आणि मूलभूत सिद्धांत आहे; सर्व धर्मांची मूलभूत एकता; धार्मिक, वांशिक, जातीय किंवा राष्ट्रीय अशा सर्व प्रकारच्या पूर्वग्रहांचा निषेध; धर्म आणि विज्ञानात आवश्यक असणारे सामंजस्य; पुरुष आणि स्त्रियांची समानता, दोन पंख ज्यावर मानवजातीचा पक्षी भरारी मारण्यास सक्षम असेल; अनिवार्य शालेय शिक्षणाची लागवण; एक आंतरराष्ट्रीय दुय्यम भाषेचा स्वीकार; अत्याधिक गरिबी व अत्याधिक श्रीमंतीचे उच्चाटन; वेगवेगळ्या राष्ट्रांमधील विवादांचे निरासरण करण्यासाठी एका जागतिक न्यायाधिकरण संस्थेची स्थापना; सेवाभावनेतून केलेल्या कामाला उपासनेचा दर्जा; मानवी समाजातील सत्ताधारी तत्त्व म्हणून ‘न्यायाचे’ गौरव, आणि सर्व लोकांच्या आणि राष्ट्रांच्या संरक्षणासाठी धर्म एक अत्यंत मजबूत आधार; आणि सर्व मानवजातीचे सर्वोच्च ध्येय म्हणून चिरस्थाई आणि वैश्विक शांततेची स्थापना.”

सनातन वैभवाचे सेवक

अब्दुल-बहांनी वेळोवेळी ही पुष्टि केली होती की ते “शांतता आणि सलोख्याच्या संदेशाचे दूत आहेत”, “मानवतेच्या एकतेचे पक्षधार आहेत”, आणि मानवतेला “परमेश्वराच्या साम्राज्याकडे” घेवून जाणारे मध्यस्त आहेत.

त्यांना सर्वाधिकार दिल्यानंतरही अब्दुल-बहांनी नेहमी हे स्पष्ट केले‌ की बहाउल्लाह त्यांच्या विचारप्रवाहाचे उगम आहेत. अमेरिकेतील त्यांच्या अनुयायांना लिहिलेल्या एका पत्रात ते लिहतात: “माझे नाव आहे अब्दुल-बहा (शब्दशः ‘बहाउल्लाह ह्यांचे सेवक’), माझी ओळख आहे अब्दुल-बहा, माझी पात्रता आहे अब्दुल-बहा, माझी वास्तविकता आहे अब्दुल-बहा, माझी स्तुती आहे अब्दुल-बहा. अनुग्रहित पूर्णत्वासाठी (बहाउल्लाह ) दास्यत्व हे माझे वैभवशाली व तेजोमय राजमुकुट, सर्व मानववंशासाठी दासता हा आहे माझा चिरंतन धर्म…. अब्दुल-बहा शिवाय मला कोणतेही नाव नाही, उपाधि नाही, स्तवन नाही, प्रशंसा नाही किंवा कदापि असणार नाही. ही आहे माझी आकांक्षा. ही आहे माझी अतिमहान उत्कंठा. हे आहे माझे अमर जीवन. हे आहे माझे अविनाशी वैभव.”

या विषयी अधिक माहिती

Back to Top